गाव ग्रंथालये व्हाया सरकारी शाळा
“कोणत्याही बालकाला शिक्षणापासून वंचित ठेवले जाणार नाही आणि त्याचे मन मारले जाईल अशा शाळेत त्यालाजावे लागणार नाही,”
अशा एका जगाचे स्वप्न उराशी बाळगून महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटण गावात१९७८ साली डॉ मॅक्सीन बर्नसन यांनी प्रगत शिक्षण संस्थेची सुरूवात केली. अगदी वंचितांपासून ते उच्चवर्गीयांपर्यंत सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे गरजेचे आहे आणि प्रत्येक मूल जन्मतः शिकण्याच्या ज्या नैसर्गिक प्रेरणा घेऊन येते त्या शिक्षणाच्या प्रक्रियेत मारल्या जाऊ नयेत अथवा त्यांना लगाम बसू नये ही संस्थेची मुख्य तत्त्वे.
देशभरात प्रयोगशील म्हणून ओळखली जाणारी कमला निंबकर बालभवन ही शाळा प्रगत शिक्षण संस्थेने सुरू केली. पण आपल्या स्वतःच्या एक-दोन शाळा सुरू करून आपले व्यापक स्वप्न पूर्ण होणे शक्य नाही हे संस्थेने जाणले.हे स्वप्न सत्यात उतरवायचे असेल तर मुख्य प्रवाहात असलेल्या शासनाच्या शाळांबरोबर काम क...